KCC scheme – किसान क्रेडिट कार्ड वरून कर्ज कसे मिळवायचे हा शेतकऱ्यांना सर्वात मोठा प्रश्न पडलेला असतो शेतीसाठी बियाणे खते कीटकनाशके तसेच शेतात कामे करण्यासाठी मजुरी पिक उत्पादनाचा खर्च अशा काही गोष्टीसाठी लागणाऱ्या खर्चामुळे शेतकरी पैशाची अडचण असल्यामुळे कर्ज काढत असतो तर अशावेळी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड ही कर्ज सुविधा सर्वात महत्त्वाची ठरू शकते तर हे कर्ज कसे काढायचे ती पूर्ण प्रोसेस जाणून घेऊ.
हे कर्ज काढण्यासाठी शेतकऱ्यांना खते बियाणे कीटकनाशके तसेच कापणी शेतमालाची व्यवस्थापन करण्यासाठी हे कर्ज देण्यात येत असते. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वरून किती कर्ज मिळत असते हे पाहू तर प्रत्येक शेतकऱ्यांना सर्व समान कर्ज मिळत नसते कर्जाची मर्यादा ठरवताना जमिनीचे क्षेत्रफळ तसेच कोणते पीक घेतले पिकाचा खर्च किती आणि शेतीची गरज तसेच बँकांचे नवीन नियम या सर्व गोष्टींचा विचार करून शेतकऱ्यांना कर्ज दिले जात असते त्यामुळे शेतकऱ्यांना एकच निश्चित रक्कम मिळत नसते तुमच्या परिस्थितीनुसार बँक तुम्हाला कर्जाची मर्यादा निश्चित करून शकते.
या कर्जासाठी कोण कोण पात्र आहे सर्वसामान्य शेतकरी किसान क्रेडिट कार्ड वरून अर्ज करू शकतात तर काही परिस्थितीमध्ये भाडेतत्त्वावर शेती करणारे शेतकरी शेअर कॉपर्स आणि इतर पात्र कृषी उत्पादनाकांनाही या सुविधेचा लाभ मिळू शकतो.
किसान क्रेडिट कार्ड यावरून कर्ज कसे मिळवायचे तर सर्वप्रथम केसीसी सुविधा देणाऱ्या बँकेत अर्ज करावा लागतो अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध आहे. केसीसी साठी अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळच्या बँक शाखेत जाऊन किसान क्रेडिट कार्ड लोन एप्लीकेशन फॉर्म घ्या आणि किसान क्रेडिट कार्ड लोन साठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस करू नका. त्यामध्ये तुमचे वैयक्तिक माहिती भरण्यासाठी अर्जामध्ये तुमची संपूर्ण नाव पत्ता चालू मोबाईल नंबर तसेच आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर बँक खाते हे सर्व बरोबर भरून सबमिट करा.
त्यासोबतच त्यांना तुमच्याकडे असलेली जमीन लागवडीखाली किती क्षेत्र आहे तसेच शेतीसाठी अवश्य असलेली कर्जाची लिमिट सर्व अर्जामध्ये लिहून द्या. अवश्य कागदपत्रे जमा करा बँकेने मागितलेली केसीसी लोन डॉक्युमेंट साठी सर्व कागदपत्रे जमा करा.
त्यानंतर बँकेकडून तुमची पडताळणी होण्याचा टाईम बँक तुमची पात्रता शेतीची माहिती कर्जाची गरज सर्व बाबीतापासून तुम्हाला कर्ज किती देण्याची आवश्यकता आहे हे समजून घेऊन तुम्हाला कर्ज देते. कर्ज मंजुरी पात्रता आणि बँकेच्या नियमांची पूर्तता झाल्यानंतर कर्ज मंजूर केले जाऊ शकते तर मंजूर कार्याची मर्यादा तसेच तुम्ही कोणत्या फळबागासाठी वापरत आहात अशा काही अटी बँकेकडून सांगितल्या जातात.
शेवटचे केसीसी लोन चा वापर कोणत्या कामासाठी शेतकरी वापरू शकतो. बियाणे खरेदी खते खरेदी तसेच मजुरीचा खर्च पीक काढण्याचा खर्च शेतीची मशागत कीटकनाशके कृषी औषधे यासारख्या गोष्टीसाठी शेतकरी हे कर्ज वापरू शकतो माहिती आवडल्यास खाली कमेंट मध्ये तुमची आवड लिहा धन्यवाद..!!









